गडचिरोली पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने केला अवैध दारुसह ३,६२,४००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त

गडचिरोली पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने केला अवैध दारुसह ३,६२,४००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त

दिनांक २१/०१/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथे गोपनिय माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन, गडचिरोली हद्यीतील दारु तस्कर गोपाल बावणे, रा. ढिवर मोहल्ला, गडचिरोली हा त्याचे सहका-यांच्या मार्फतीने चंद्रपुर जिल्ह्यातुन चारचाकी वाहनाने गडचिरोली शहरातील चिल्लर दारु विक्रेत्यांना देशी-विदेशी दारु व बियरचा अवैधरित्या पुरवठा करण्याकरीता मोठ्या प्रमाणात दारुची खेप आणणार आहे. अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व कर्मचारी यांनी शासकीय विश्राम भवन, गडचिरोली जवळ दिनांक २२/०१/२०२३ रोजीच्या रात्रो दरम्यान सापळा रचुन नाकाबंदी लावली असता, मिळालेल्या गोपनिय माहितीतील संशयीत पांढ-या रंगाचे मारोती सुझुकी कंपनीचे अल्टो वाहन हे येताना दिसले असता पोलीसांनी त्यास थांबविण्याकरीता ईशारा दिला. परंतू वाहन चालकानी पोलीसांच्या इशा-यास न जुमानता वाहनासह पळ काढला. त्यानंतर पोलीसांनी क्षणाचाही विलंब न करता त्या वाहनाचा पाठलाग सुरु केला. अवैध दारु वाहतुक करीत असलेल्या वाहन चालकाने कारवाई टाळण्याकरीता त्यांचे ताब्यातील वाहन गडचिरोली शहराच्या दिशेने नेत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफिने सदर वाहनास अडवीले असता वाहन चालक व त्याचा साथीदार अनुक्रमे नामे १) प्रफुल टिंगुसले, रा. गोकुळनगर, गडचिरोली व २) गणेश टिंगुसले, रा. ढिवर मोहल्ला, गडचिरोली यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीसांनी त्यांचाही पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले. सदरच्या दारुच्या अवैध वाहतुकीत सहभागी असलेला ईसम नामे गोपाल बावणे हा ही कार्यवाही सुरु असतांना अंधाराचा फायदा घेऊन दुचाकी वाहनाने फरार झाला.

त्यानंतर सदर वाहनाची तपासणी केली असता, त्यात देशी दारुच्या १४ पेट्या, विदेशी दारुच्या ०२ पेट्या, बिअरच्या ०२ पेट्या व २ लिटर क्षमतेचे विदेशी दारुचे ०६ बंपर दिसुन आल्याने पोलीसांनी सदर दारुचा मुद्देमाल व वाहतुकीकरीता वापरलेले मारुती सुझुकी कंपनीचे अॅल्टो वाहन असे एकुण ३,६२,४००/- रुपयाचा मुद्देमाल कारवाई करुन जप्त केला. संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे

गडचिरोली येथे दिलेल्या तक्रारीवरुन कलम ६५ (अ), ९८ (२), ८३ महा. दा. का. अन्वये आरोपी नामे गोपाल बावणे, गणेश टिंगुसले व प्रफुल टिंगुसले यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कार्यवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)

श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा. व स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक श्री. उल्हास भुसारी यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. राहुल आव्हाड, पोअं/प्रशांत गरुफडे, श्रीकृष्ण परचाके व चापोना/दिपक लोणारे यांनी केलेली आहे.