दिव्यांगांना चालता येत नसल्यामुळे त्यांचा घरी जाऊन लस देण्यात आली.

ग्रामपंचायत पालोरा येथे 27 ऑगस्टला 2021 रोजी कोव्हीशिल्ड चा लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात आला. त्यामध्ये 89 नागरिकांनी लसीकरण केलं त्यामध्ये काही दिव्यांगांना चालता येत नसल्यामुळे त्यांचा घरी जाऊन लस देण्यात आली. तसेच 103 वर्षाच्या आजीला आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरी जाऊन ग्रामपंचायतला घेऊन आणले आणि आजी बाईने लस घेतली.
ग्रामपंचायत पालोरा येथे आजपर्यंत 80 टक्के लसीकरण झालेले आहे. यामध्ये ग्रामसेवक, तलाठी, शाळेचे शिक्षक, उमेदच्या महिला, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून सहकार्य केले.