चंद्रपूर मनपातर्फे स्वराज्य महोत्स अंतर्गत वृक्षारोपण…

चंद्रपूर १० ऑगस्ट – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव साजरा करण्यात येत आहे.यानिमित्ताने चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे स्व. कल्पना चावला उद्यान, जगन्नाथ बाबा नगर येथे दिनांक ९ ऑगस्ट 2022 रोजी वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी आयुक्त राजेश मोहीते, उपायुक्त अशोक घरटे सहायक आयुक्त विद्या पाटील उपअभियंता रवी हजारे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले

आयुक्त राजेश मोहीते यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, पर्यावरणामध्ये वृक्षांचे महत्व विषद करताना निर्सगावर मोठ्या प्रमाणात केलेल्या मानवी हस्तक्षेपामुळे जागतिक तापमानवाढ, दुष्काळ, अतिवृष्टी या सारख्या नैसर्गिक आपत्तींना वारंवार सर्व जगास सामोरे जावे लागत आहे. स्व. कल्पना चावला उद्यान येथे वृक्षारोपण करण्यात आलेल्या वृक्षांचे जतन व संवर्धन करणेसाठी सामाजिक बांधीलकी समजून नागरिकांनी एका वृक्षाचे संगोपन करण्याची जबाबदारी घ्यावी. तसेच दैनंदिन जीवन जगत असताना पर्यावरण पुरक जीवनशैली स्विकारावी व वृक्षारोपण मोहिमेचा शाश्वत आणि दीर्घकाळ परिणाम साधण्यासाठी लोकांनी पुढे येऊन या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या प्रसंगी परीसरातील सुरेशराव गोरंशेट्टीवार , अशोक दुष्कर , नरेंद्र बुक्कावार , सुभाष चिलके , डांगेवार ,विगनेश्वर , विजय खापणे , अनिल अडवाणी , नंदनवार , अंकेश बेकुलवार , वामन बुक्के , सुरेश निखाडे सौ . रेखा गोरंशेट्टीवार, सौ .अनिता दुष्कर, सौ . कविता दुष्कर , सौ . गायत्री नंदनवार , सौ. बुक्कावार, अर्चना रामटेके उपस्थित होते .