गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत महिला बास्केटबॉल संघाचा सराव शिबिर

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत महिला बास्केटबॉल संघाचा सराव शिबिर

सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही येथे दिनांक ०८/०१/२०२४ ते ११/०१/२०२४ पर्यंत आयोजित करण्यात आला आहे.संघाला प्रशिक्षक निनाद शेंद्रे व डॉ लेमदेव नागलवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव शिबिर सकाळी ७- ३० ते ९-३० पर्यंत दुपारी ४-००ते ६-०० पर्यंत चालत होता यानंतर हा महिला बास्केटबॉल संघ अश्वमेध स्पर्धेकरीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथे दिनांक १२/०१/२०२४ ते १६/०१/२०२४ पर्यंत होणाऱ्या महाराष्ट्र अश्वमेध स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे.याअगोदर महिला बास्केटबॉल संघाचा वेष्टझोन स्पर्धेत सहभागी होवून आलेला आहे . या संघाला अश्वमेध स्पर्धेकरिता रवाना करताना संस्थाध्यक्ष माननीय योगेंद्र जयस्वाल यांनी शुभेच्छा दिल्या तसेच कार्यकारी प्राचार्य डॉ.राजेश डहारे यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्गाकडून व शिक्षकेतर कर्मचाऱ्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या व संघाला अश्वमेध स्पर्धेकरिता रवाना करण्यात आले धन्यवाद