गडचिरोली जिल्ह्याकरीता स्थानिक सुट्टी जाहीर

गडचिरोली जिल्ह्याकरीता स्थानिक सुट्टी जाहीर

गडचिरोली, दि.12 : महाराष्ट्र शासन राजकीय आणि सेवा विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी, गडचिरोली यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन सन 2024 या वर्षाकरिता संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याकरीता पुढीलप्रमाणे स्थानिक सुट्टया जाहीर करण्यात आले आहे. शुक्रवार, दिनांक 09 ऑगस्ट 2024 रोजी जागतिक आदिवासी दिन, मंगळवार, दि. 03 सप्टेंबर 2024 रोजी पोळा (दुसरा दिवस), गुरुवार, दि. 31 ऑक्टोबर 2024 रोजी दिवाळी (नरक चतुर्दशी). असे जिल्हाधिकारी, गडचिरोली संजय मीणा यांनी कळविले आहे.