तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, चामोर्शी येथील पदाबाबत

तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, चामोर्शी येथील पदाबाबत

गडचिरोली, दि.12:चामोर्शी तालुक्यात तालुका स्तरावर तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकिस्तालय, चामोर्शी दवाखाना कार्यरत असून येथे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी, पटटीबंधक, परिचर व वरिष्ठ लिपिक यांचे प्रत्येकी 01 पद मंजुर असून सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी व पटटीबंधक यांचे पद भरलेले आहे. फक्त परिचर व वरिष्ठ लिपिक यांचे पद रिक्त आहे. असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, गडचिरोली डॉ. विलास गाडगे यांनी कळविले आहे.