खा.अशोक नेते यांनी घेतले नरेंद्राचार्य महाराजांचे पादुका दर्शन

खा.अशोक नेते यांनी घेतले नरेंद्राचार्य महाराजांचे पादुका दर्शन
स्व-स्वरुप संप्रदाय भक्त सेवा मंडळाचे आयोजन

ब्रह्मपुरी : तुम्ही जगा, अन् दुसऱ्यालाही जगवा असा संदेश देणाऱ्या स्वामी नरेंद्राचार्य महाराजांचा पादुका दर्शन सोहळा ब्रह्मपुरी येथे आयोजित केला होता. यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील भाविक भक्तगण उपस्थित होते. खासदार अशोक नेते यांनीही या सोहळ्याला उपस्थित राहून पादुकांचे दर्शन घेतले.

बाजार समितीसमोरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडांगणावर स्व-स्वरुप संप्रदाय भक्त सेवा मंडळाच्या वतीने या भव्य सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी समितीच्या अध्यक्षांनी खा.नेते यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील नागरिकांचे दु:ख, संकट दूर होऊन त्यांचे सदैव कल्याण होवो, अशी प्रार्थना यावेळी खा.नेते यांनी केली.