राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे युवकांना आवाहन

राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे युवकांना आवाहन

गडचिरोली, दि.05:महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडे गुरव समाजासाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ आणि लिंगायत समाजासाठी जगद्ज्योती महात्मा बसवेश्र्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापणा दि.9 ऑगस्ट 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार झाली आहे. या दोन्ही महामंडळाचे कामकाज महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत कार्यान्वित करण्यात आले आहे. या महामंडमार्फत अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन आय.टी.आय.मागे कॉम्पलेक्स गडचिरोली 07132-223024 येथे संपर्क साधवा,असे आवाहन राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ गडचिरोली जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.