शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2022-23

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2022-23

गडचिरोली, दि.05:महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जेष्ठ क्रीडा महर्षीकरीता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरीता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
शासनाने नुकत्याच दि. 29 डिसेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली, 2023 ची नियमावली विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन 2022-23 या वर्षाच्या पुरस्कारासाठी दि. 8 जानेवारी ते 22 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. पुरस्काराकरीता राज्यातील जेष्ठ क्रीडा पटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी यांचेद्वारा अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज सादर करणाऱ्या इच्छूक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी विहीत मुदतीत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.inसंकेतस्थळावरील स्क्रोलिंग लिंक (Scrolling Link) मध्ये उपलबध करुन दिलेल्या लिंकवर दि. 8 जानेवारी ते 22 जानेवारी, 2024 पर्यंत या कालावधीत दि. 22 जानेवारी, 2024 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत फक्त ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत क्रीडा विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.