क्रीडा प्रबोधिनी पुणे अंतर्गत जलतरण करीता निवड चाचणीचे आयोजन

क्रीडा प्रबोधिनी पुणे अंतर्गत जलतरण करीता निवड चाचणीचे आयोजन

गडचिरोली, दि.05: राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याकरिता क्रीडा प्रबोधिनींतर्गत राज्यात प्रतिभावंत खेळाडूंची निवड करून शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षण, शिक्षण, भोजन, निवास तसेच अद्यावत क्रीडा सुविधा पुरविण्यात येतात. क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत पुणे येथे जलतरण खेळाच्या प्रशिक्षणाकरीता व संघ उभारणी करीता नव्याने खेळाडू भरती करणेकरीता 8 ते 16 या वयोगटातील खेळाडूंची निवड चाचणीचे आयोजन दि.12/07/2022 रोजी सकाळी 08.00 वाजता करण्यात येणार आहे. सदर चाचणी राज्यस्तर प्राविण्य प्राप्त व राज्यस्तर सहभागी खेळाडूंना देता येईल.चाचणीस जाताना खेळाडूंनी जन्म तारखेचा दाखला सोबत नेणे अनिवार्य आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सदर चाचणीत सहभाग घ्यावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांनी कळविले आहे. अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.