जनावरांसाठी राज्यव्यापी वंधत्व निवारण अभियान

जनावरांसाठी राज्यव्यापी वंधत्व निवारण अभियान

चंद्रपूर, दि. 29 : शेतकरी, पशुपालक यांच्याकडील गाई म्हशींमध्ये असलेल्या/उद्भवलेल्या वंधत्वाचे निवारण करण्याकरिता 30 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर 2023 या कालावधीत गावनिहाय शिबीर आयोजित केले आहे.

सर्व साधारणपणे कालवडी 250 किलो ग्रॅम तर पारड्या 275 किलो ग्रॅम शारीरिक वजन गाठल्यानंतर पहिला माज दर्शवितात. त्यामुळे गाई म्हशींची वाढ आणि त्यांचे शारीरिक वजन याबाबत शिबिरात मार्गदर्शन करण्यात येईल.

जनावरांना होणारा गोचीड व गोमाशा प्रादुर्भाव, पशुंचा आहार व त्यांचे स्वास्थ्य, नियमित कालांतराने जंतनाशक औषधांचा वापर, वंधत्वाची विविध कारणे, त्याचे प्रकार, करावयाच्या  उपाययोजना, औषधोपचार, माजाची लक्षणे, मुका माज, माज कसा ओळखावा, कृत्रिम रतन करण्याची योग्य वेळ ई. बाबत मार्गदर्शन करण्यात येईल. गर्भाशय दाह असल्यास त्यावर उपाय सुचविण्यात येईल.

तरी राजुरा तालुक्यात गावोगावी होणाऱ्या वंधत्व निवारण शिबिरात पशुपालकांनी आपल्या जनावरांना तपासणीसाठी आणावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन) डॉ.सुचिता धांडे, पशुधन विकास अधिकारी (विस्तार)डॉ.  हरिनखेडे यांनी केले आहे.