चंद्रपूर पोलिसांतर्फे वाहतुक नियमाविषयी जनजागृत्ती रॅली

चंद्रपूर पोलिसांतर्फे वाहतुक नियमाविषयी जनजागृत्ती रॅली

महाराष्ट्र चंद्र पोलीस स्थापना दिना निमीत्यपुर जिल्हयात दि.०२/०१/२०२४ पासुनच उपक्रम राबविण्यात येत आहे. आज दि.०४/०१/२०२४ रोजी वाहतुक नियंत्रण शाखे तर्फे पोलीस स्थापना दिनानिमित्त मा.पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी अपर पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात वाहतुक नियमाविषयी जनजागृत्ती रॅली आयोजीत करण्यात आली होती. सदर रॅलीचे प्रमुख पाहुणे म्हणुन जितेंद्र गादेवार, तहसिलदार चंद्रपुर विभाग हे उपस्थित होते. मा. श्री. जितेंद्र गादेवार सा. यांनी रॅली ला हिरवा झेंडा दाखवुन रॅलीला सुरूवात केली.सदरॅलीमध्ये भवानजी भाई रब्बी भाई हायस्कुल, रफी अहमद किदवाई हायस्कुल, सेंट फ्रान्सिस कॉनहॅट, छोटुभाई पटेल हायस्कुल, बापुराव वानखेडे या सर्व शाळेमधील आर.एस.पी., एन.सी.सी व इतर विद्याथी असे एकुण २००विद्यार्थी हजर होते. वाहतुक निमयांविषयी नागरीकांमध्ये जनजागृत्ती करीता रॅली वाहतुक नियंत्रण शाखा ते प्रियदर्शिनी चौक व प्रियदर्शिनी चौक ते वाहतुक नियंत्रण शाखा पर्यंत रॅली काढण्यात आली.रॅली मध्ये उप प्रादेशीक परीवहन विभागाचे अधिकारी गौरव तेलरांधे, अनुराग सालंनकर, वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस निरिक्षक रोशन यादव, प्रविणकुमार पाटील, पोउपनि सुधिर जाधव तसेच इतर अधिकारी व कर्मचारी आणी शिक्षकवर्ग उपस्थित होते.