दुसऱ्या दिवशी 511 मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क  

दुसऱ्या दिवशी 511 मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क  

           भंडारा, दि.9 : 11 भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात गृह मतदान म्हणजे होम वोटिंग प्रक्रिया मतदारसंघात सुरू झाली आहे. काल आठ एप्रिल रोजी भंडारा जिल्ह्यातून 334 (85 वर्षावरील व दिव्यांग मतदारांनी) गृह मतदान सुविधेचा लाभ घेत मतदानाचा हक्क बजावला. तर गोंदियात 177 मतदारांनी गृहमतदान केले.

           सात एप्रिल,2024 पासून लोकसभा मतदारसंघात गृह मतदान सुरू झाले आहे. त्यानुसार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या  टीम करून त्याद्वारे गृह मतदान प्रक्रिया आयोगाच्या निर्देशानुसार सुरळीतपणे पार पाडली आहे. सात एप्रिल रोजी भंडारा जिल्ह्यात 536 मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला होता.