गडचिरोली : जिल्हयातील पूर‍ स्थितीबाबत संक्षिप्त अहवाल

जिल्हा पूरनियंत्रण कक्ष, गडचिरोली

गडचिरोली जिल्हयातील पूर‍ स्थितीबाबत संक्षिप्त अहवाल

दिनांक : 22.07.2021, सायंकाळी-7.00 वाजता
————-
1. वैनगंगा नदी :
# गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 33 गेट बंद असुन पॉवर हाऊस मधून 184 क्युमेक्स विसर्ग सुरु आहे. विसर्ग *सामान्य आहे.
# चिचडोह बॅरेज चे 38 पैकी 38 गेट उघडलेले असुन विसर्ग 587 क्युमेक्स आहे.
# वैनगंगा नदीची पाणी पातळी पवनी, वडसा, वाघोली व आष्टी सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार *सामान्य* असुन इशारा पातळीच्या खाली आहे.

2. वर्धा नदी :
# निम्न वर्धा प्रकल्पाचे 31 पैकी 31 गेट बंद असुन विसर्ग निरंक आहे.
# वर्धा नदीची पाणी पातळी बामणी (बल्हारशा) व सकमूर सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार *सामान्य असून इशारा पातळीच्या खाली आहे. नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.

3. प्राणहिता नदी :
# प्राणहिता नदीची पाणी पातळी महागांव व टेकरा सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार *सामान्य असुन इशारा पातळीच्या खाली आहे. नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.

4. गोदावरी नदी :
🔴# मेडीगड्डा बॅरेज चे 85 पैकी 41 गेट सुरु असुन विसर्ग 7593 क्युमेक्स (2,68,130 क्युसेक्स) आहे. गोदावरी नदी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे बॅरेजच्या उर्ध्व भागात असलेल्या श्रीरामसागर प्रकल्प, कड्डम प्रकल्प, येलमपल्ली प्रकल्प, पार्वती बॅरेज व सरस्वती बॅरेज मधून विसर्ग सोडल्याने रात्रो 9.00 वाजेपर्यंत बॅरेजचे पुन्हा 23 गेट उघडण्यात येऊन अंदाजे 16,990 क्युमेक्स ( 6 लक्ष क्युसेक्स) पर्यंत विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे. नदी काठावरील गावातील नागरीकांनी सतर्कता बाळगावी.
# गोदावरी नदीची पाणीपातळी कालेश्वरम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार सद्य:स्थितीत *सामान्य असुन इशारा पातळीच्या खाली आहे.

*5. इंद्रावती नदी :
# इंद्रावती नदीची पाणी पातळी जगदलपूर, चिंदनार व पाथागुडम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार *सामान्य* असुन इशारा पातळीच्या खाली आहे.

# *पर्लकोटा नदीची पाणी पातळी भामरागड सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार *सामान्य* असुन इशारा पातळीच्या खाली आहे.