27 डिसेबर, रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा  

27 डिसेबर, रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा  

          भंडारा दि. 26 : बुधवार 27 डिसेबर,2023 रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय  ग्राहक दिनानिमित्त अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग,जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय,येथे राष्ट्रीय दिनाचा कार्यक्रम खालील मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला आहे.

          या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी श्री.योगेश कुंभेजकर, प्रमुख अतिथी सदस्या,जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग,विभागाचे श्रीमती.जयश्री बी.गोपनारायण,

         तसेच भंडारा जिल्ह्यातील सर्व ग्राहक संघटनेचे पदाधिकारी व भंडारा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य यांचे उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे.तरी या कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन सदस्य-सचिव जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद तथा जिल्हा पुरवठा अधिकारी,नरेश वंजारी यांनी कळविले आहे.