विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश..

विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश..

आंतरवासिता विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाच्या प्रश्नावर निघाला तोडगा

नागपूर,
विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आंतरवासिता (इंटर्न) विद्यार्थ्यांचे विद्यावेतन २२ हजार रुपये महिना करण्याच्या जुन्या त्रुटी असलेल्या प्रस्तावात सुधारणा करण्यात आली आहे. सुधारित प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण खात्याकडून वित्त खात्यास सादर करण्यात आला आहे. त्यामुळे आता आंतरवासिता विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाच्या प्रश्नावर लवकरच तोडगा निघणार आहे. या प्रस्तावास शासनाने तातडीने मंजुरी देऊन आंतरवासिता विद्यार्थ्यांना विद्यावेतनाचा लाभ तात्काळ देण्यात यावा अशी आग्रही मागणीही विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

कर्नाटक, आसाम, पश्चिम बंगाल, ओडिसा, दिल्ली , छत्तीसगड या राज्यांमध्ये मिळणाऱ्या विद्यावेतनाच्या तुलनेत राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आंतरवासिता (इंटर्न) विद्यार्थ्यांचे विद्यावेतन तुलनेने अत्यल्प आहे. याकडे विधानसभा विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे लक्ष वेधले. असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स महाराष्ट्र यांच्यासमवेत लवकरच बैठक लावण्याची विनंतीही श्री. वडे्टीवार यांनी केली. विद्यावेतन २२ हजार रुपये महिना करण्याचा प्रस्ताव १५ आक्टोबर २०२३ रोजी वैद्यकीय सचिवांमार्फत शासनाला सादर केला होता. जुन्या प्रस्तावात बी.ए.एम.एस व बी.यू.एम.एस चा समावेश करण्यात आलेला नव्हता हे शासन नियमात बसणारे नव्हते ,हे असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स महाराष्ट्र या संघटनेने श्री.वडेट्टीवार यांना सागितले. यावर श्री. वडेट्टीवार यांनी तात्काळ या प्रस्तावात सुधारणा करण्यास सांगितले आणि बैठक लावण्याची विनंती केली होती. अखेर श्री. वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांमुळे विद्यावेतन संदर्भात ऑक्टोंबरच्या प्रस्तावात सुधारणा करण्यात आली असून तो प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण खात्याकडून वित्त खात्याकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासूनचा आंतरवासिता विद्यार्थ्यांच्या वेतनवाढीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याने संघटनेतर्फे संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ.अथर्व शिंदे यांनी श्री. वडेट्टीवार यांचे आभार मानले आहे.