मुख्य समारंभासाठी प्रथम येणा-याला प्रथम प्राधान्याने प्रवेश

मुख्य समारंभासाठी प्रथम येणा-याला प्रथम प्राधान्याने प्रवेश

Ø सुरक्षेच्या दृष्टीने गर्दी टाळण्यासाठी नागरिकांसाठी बाहेर स्क्रीनची व्यवस्था

चंद्रपूर, दि. 25 : बल्लारपूर येथील तालुका क्रीडा संकूल येथे होणा-या 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचा ज्वर चांगलाच चढला आहे. विविध राज्यातून मोठ्या संख्येने खेळाडू चंद्रपुरात दाखल झाले आहेत. दि. 27 डिसेंबर 2023 रोजी या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार असून भव्यदिव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचेसुध्दा आयोजन करण्यात आले आहे.

      सदर कार्यक्रमासाठी येणा-या अतिमहत्वाच्या व्यक्ती तसेच विविध राज्यातील मोठ्या प्रमाणात येणा-या खेळाडूंची संख्या लक्षात घेता मैदानातील गर्दी टाळण्यासाठी पहिल्या एक हजार व्यक्तिंनाच प्रवेश देण्यात येणार आहे. उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रथम येणा-याला प्रथम प्राधान्य, या तत्वानुसार नागरिकांना मैदानात प्रवेश दिला जाईल. उर्वरीत नागरिकांना सदर कार्यक्रम बघता यावा, यासाठी प्रशासनाने स्टेडीयमच्या बाहेर मोठ्या स्क्रीनची व्यवस्था केली आहे. तेथे बसूनसुध्दा या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना मैदानात प्रवेश मिळाला नाही, अशा नागरिकांनी स्क्रीनवर हा कार्यक्रम बघावा व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आयोजन समितीने केले आहे.