भंडारा जिल्हयातील मतदान केंद्राच्या प्रस्तावास आयोगाची मान्यता 

भंडारा जिल्हयातील मतदान केंद्राच्या प्रस्तावास आयोगाची मान्यता 

भंडारा,दि.26 :11-भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातर्गत भंडारा जिल्हयातील 60-तुमसर, 61-भंडारा व 62-साकोली विधानसभा मतदारसंघाच्या मतदार केंद्राच्या प्रस्तावास मान्यता दिली असून सदर मतदान केंद्रांची यादी संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात तसेच तहसिलदार कार्यालय, पंचायत समिती, जिल्हापरिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत या ठिकाणी पहावयास उपलब्ध होतील. तसेच https:bhandara.gov.in या वेबसाईटवर देखिल पाहण्यास उपलब्ध आहेत. तरी मतदारांना आपले मतदान केंद्र, मतदानाचे पुर्वी तपासुन घ्यावी असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी, श्री योगेश कुंभेजकर  11-भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ यांनी केली आहे.