बारावी विज्ञान शाखेतील विदयार्थ्यांनी 15 जानेवारी 2024 पुर्वी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी करावी

बारावी विज्ञान शाखेतील विदयार्थ्यांनी 15 जानेवारी 2024 पुर्वी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी करावी

भंडारा दि. 22 : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात विज्ञान शाखेतील 11 वी 12 वीच्या विदयाथ्यांनी जात वैधता प्रमाणपत्राकरीता अर्ज सादर करण्यासाठी यापूर्वी संबंधित महाविदयालयाला सभेमध्ये व पत्राव्दारे कळविण्यात आलेले आहे. त्यानुसार बऱ्याच महाविदयालयांनी या कार्यालयाला अर्ज सादर केलेले आहे. परंतु ज्या विदयार्थ्यांनी अजुनपर्यंत जात वैधता प्रमाणपत्राकरीता अर्ज सादर केलेला नाही अशा विदयार्थ्यांनी 15 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज CCVIS / barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरून मॅनुअली पदधतीने अर्ज व प्रवर्गनिहाय कागदपत्रे जोडुन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करावे.

 15 जानेवारी 2024 नंतर इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतील विदयार्थ्यांचे अर्ज स्विकारले जाणार नाही. तसेच वर्ग 11 वी विज्ञान शाखेतील विदयार्थ्यांनी जात वैधता पडताळणीचे अर्ज 15 मार्च 2024 पुर्वी सादर करावे. 15 मार्च 2024 नंतर प्रस्ताव स्विकारले जाणार नाही याची गांभिर्याने नोंद घ्यावी. असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती भंडारा डॉ. मंगेश वानखडे यांनी केले आहे.