अनुसूचित जमातीकरिता धुर विरहीत चुल योजना

अनुसूचित जमातीकरिता धुर विरहीत चुल योजना

 

भंडारा दि.13: केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत जिल्हयातील अनुसूचित जमातीच्या शेतकरी लाभार्थ्याकरिता 100 टक्के अनुदानावर, वन्य प्राणी प्रतिकारक साधन व अनुसूचित जमातीच्या सर्वसाधारण लाभार्थ्याकरिता धुर विरहीत चुल योजना 100 टक्के अनुदानावर विनामुल्य मंजूर झालेली आहे.

सदर योजनेकरिता इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज प्राप्त करण्याकरिता व भरलेले अर्ज सादर करण्याकरिता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, आदिवासी मुला-मुलीचे शासकीय वसतीगृहे, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, खापा येथे कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. तसेच परीपुर्ण भरलेले अर्ज 30 जुलै 2023 पर्यत सादर करावे, असे प्रकल्प अधिकारी निरज मोरे यांनी कळविले आहे.

अर्जासोबत सक्षम अधिकाऱ्यांने दिलेले अनुसूचित जमातीचे ST जात प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला, सात-बारा दाखला, उत्पन्न दाखला (तहसिलदार यांनी दिलेला), आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बॅकेचे पासबुकच्या प्रथम पानाची सत्यप्रतप अर्जासोबत जोडावी.