सफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा -डॉ.पी.पी. वावा

सफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा
-डॉ.पी.पी. वावा

भंडारा दि.8: राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग नवी दिल्लीचे सदस्य डॉ.पी.पी. वावा यांच्या अध्यक्षतेखाली आज नियोजन सभागृहात भंडारा–गोंदीया या जिल्हयाचा आढावा घेण्यात आला. सफाई कर्मचारी यांच्या विविध विषयांवर त्यांनी दोन जिल्हयाचा आढावा घेतला. यावेळी सफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न नियमानुसार मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीस डॉ.वावा यांच्यासह सल्लागार श्री.नाथ,यांच्यासह जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, गोंदिया जिल्हाधिकारी प्रजित नायर,मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, अतिरीकत पोलीस अधिक्षक इश्वर कातकडे,निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, उपस्थित होते.श्री .कुंभेजकर यांनी डॉ. वावा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी डॉ.वावा यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे कामाचे कौतुक केले. सफाई कर्मचाऱ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळावा व शासनाद्वारे वेळोवेळी काढण्यात आलेले शासन निर्णयांची अंमलबजावणी करण्यात यावी. कामगारांना कठीण समस्यांना सामोरे जावे लागणार नाही तसेच हक्कापासून सफाई कामगार वंचित राहणार नाहीत, याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
सफाई कर्मचारी कार्यरत असलेल्या सर्व आस्थापनांचा व त्यातील असणा-या प्रलंबित प्रकरणांचा आढावा श्री.वावा यांनी घेतला.यावेळी सफाई कर्मचारी व त्यांच्या संघटनांचे प्रतिनीधी उपस्थित होते.
आज सकाळीही डॉ.वावा यांनी जिल्हयातील सर्व नगर परिषदांचा आढावा घेतला .या बैठकीत नगर परिषद क्षेत्रात लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्क नियुक्ती प्रकरणाचा आढावा घेण्यात आला.त्यासोबत सफाई कर्मचारी निवासस्थानाबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेचा आढावा घेतला.