रामनगर पोलीस स्टेशनमधील भंगार मोटार सायकल विक्रीसाठी निविदा आमंत्रित

रामनगर पोलीस स्टेशनमधील भंगार मोटार सायकल विक्रीसाठी निविदा आमंत्रित

Ø 25 डिसेंबर रोजी होणार वाहनांचा जाहीर लिलाव

चंद्रपूर दि. 20 : पोलीस स्टेशन, रामनगर येथे बऱ्याच कालावधीपासून जमा असलेल्या वाहनांबाबत त्यांचा हक्क सांगण्यासाठी किंवा प्रस्थापित करण्यासाठी पोलीस स्टेशनला कोणीही हजर न झाल्याने सदर वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येत आहे. याकरीता इच्छूक खरेदीदारांकडून सीलबंद निविदा मागविण्यात येत आहे.

 एक मोटार सायकल वाहनाची शासकीय किंमत 2 हजार रुपये आहे. नमूद वाहन टेंडरद्वारे जिथे आहे तिथे वाहनाचे इंजिन व चेचीस नंबर मिटवुन आणि वाहनाची विल्हेवाट लावून भंगारमध्ये विक्री करावयाची आहे. दि. 23 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत अमानत रक्कम रुपये 200 भरावे लागेल. सदर वाहनाचा लिलाव 25 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत पोलीस स्टेशन, रामनगर येथे करण्यात येईल.

लिलावाच्या अटी व शर्ती :

वाहने ज्या स्थितीत आहे, तशीच विक्री केली जाईल. लिलावाच्या वेळी व ठिकाणी तपशीलवार अटी व शर्ती वाचण्यात येईल. विक्री रकमेच्या 10 टक्के अमानत रक्कमेचा भरणा केल्यावर ज्यांचे नावाने सदर वाहनांचा लिलाव मंजूर होईल त्या खरेदीदारास उर्वरित रकमेचा भरणा त्वरीत लिलावाच्या ठिकाणीच भरणे बंधनकारक राहील. जर सदरचा भरणा त्वरीत मुदतीत न केल्यास भरलेली 10 टक्के रक्कम कोणत्याही प्रकारची नोटीस न देता जप्त करण्यात येईल आणि मालमत्ता विक्रीची कार्यवाही परत करण्यात येईल. वाहनांचे इंजिन व चेचीस नंबर मिटवून व वाहनाचे तुकडे करून भंगारमध्ये विक्री करण्यात यावे. ज्यांच्याकडे भंगार खरेदी-विक्री करण्याबाबत परवाना आहे, अशाच परवानाधारकास लिलावामध्ये प्रवेश देण्यात येईल. लिलावाच्या बोली स्विकारणे, न स्विकारणे, लिलाव कायम करणे, पुढे ढकलणे किंवा रद्द करणे तसेच इतर कोणतेही कारण न देता सर्व अधिकार रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्याकडे राहील, याची नोंद घ्यावी.