वनहक्क धारक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी  करावी

वनहक्क धारक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी  करावी

            भंडारा, दि.10:आधारभुत किंमत धान खरेदी योजना खरीप हंगाम 2023-24 अंतर्गत धान खरेदी करीता ऑनलाईन शेतकरी नोंदणीची मुदत दि.15/01/2024 आहे. भंडारा जिल्ह्यातील अनुसूचित जमाती व इतर पारंपारीक वन निवासी (वन हक्काची मान्यता) अधिनियम 2006 व नियम 2008 व सुधारणा नियम 2012 च्या अंमलबजावणी नुसार जिल्हास्तरीय वनहक्क समिती जिल्हाधिकारी, भंडारा यांनी मान्य केलेल्या तसेच जिल्हाधिकारी (पुरवठा) कार्यालय, भंडारा यांचेकडून प्राप्त यादीनुसार शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे.

         भंडारा जिल्हयात गेल्या हंगामाच्या तुलनेत अजुनही बऱ्याच वनहक्क धारक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी होणे बाकी आहे. तरी अशा वनहक्क धारक सर्व शेतकऱ्यांना आधारभुत किंमत धान खरेदी योजनेचा लाभ मिळण्याकरीता आपल्या नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे.

          तरी नोंदणी करताना खरेदी केंद्रावर जातांना 1) वनहक्क 7/12 उतारा 2) आधार कार्ड 3) बैंक पासबुकची झेरॉक्स 4) मोबाईल क्रमांक या ऑनलाईन शेतकरी नोंदणी करतांना प्रत्यक्ष शेतकरी नोंदणी केंद्रावर हजर असला पाहिजे व नोंदणी करतांना शेतकऱ्यांचा लाईव फोटो (Live Photo) घेऊनच शेतकऱ्यांची नोंदणी करावयाची असून सदरील कागदपत्रासह नोंदणीस वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या नजिकच्या खरेदी केंद्रावर मुदतीआधी जाऊन नावाची नोंदणी करून घ्यावी.

        तसेच संबंधीत संस्थांनी नोंदणीकृत शेतकऱ्यांची धान खरेदी सुरू करावी, असे आव्हान जिल्हा पणन कार्यालय भंडारा कडून करण्यात येत आहे.