धान खरेदी केंद्रावर 18 हजाराहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी

धान खरेदी केंद्रावर 18 हजाराहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी

· ऑनलाईन नोंदणीची मुदत 31 मे पर्यंत

· जिल्ह्यात 188 धान खरेदी केंद्र सुरू

 

भंडारा, दि. 25 मे : आधारभुत किंमत धान खरेदी योजना रब्बी हंगाम 2022-23 मध्ये शासनाने शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता दिनांक 31 मे 2023 पर्यत मुदतवाढ दिली आहे. जिल्ह्यात 188 धान खरेदी केंद्र सुरू असून 18 हजार 420 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या नजिकच्या खरेदी केंद्रावर मुदती आधी जाऊन आपल्या नावाची नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एस.एस पाटील यांनी केले आहे.

 

भंडारा तालुक्यातील 19 धान खरेदी केंद्रामध्ये 2 हजार 72 शेतकऱ्यांची, मोहाडी तालुक्यातील 24 धान खरेदी केंद्रामध्ये 389 शेतकऱ्यांची, तुमसर तालुक्यातील 30 धान खरेदी केंद्रामध्ये 1 हजार 402 शेतकऱ्यांची, लाखनी तालुक्यातील 22 धान खरेदी केंद्रामध्ये 5 हजार 804 शेतकऱ्यांची, साकोली तालुक्यातील 27 धान खरेदी केंद्रामध्ये 6 हजार 363 शेतकऱ्यांची, लाखांदुर तालुक्यातील 29 खरेदी केंद्रामध्ये 728 शेतकऱ्यांची, पवनी तालुक्यातील 37 केंद्रामध्ये 1 हजार 654 शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे व महानोंदणी ॲप व ईतर खरेदी केंद्रावर 8 शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे.

 

जिल्हयातील ज्या शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झालेली नाही. अशा सर्व शेतकऱ्यांना आधारभुत किंमत धान खरेदी योजनेचा लाभ मिळण्याकरीता आपल्या नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे. खरेदी केंद्रावर नोंदणी करिता जातांना शेतकऱ्यांनी 7/12 उतारा, आधार कार्ड व बॅंक पासबुकची झेरॉक्स या कागदपत्रासह नोंदणी केंद्रावर जावून आपली नोंदणी करावी. तसेच ज्या सबएजंट संस्थांचे आय. डी. सुरू आहेत त्या संस्थांनी धान खरेदी सुरू करावी.