एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी 55 कोटीहून अधिक धानाचे चुकारे अदा

एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी 55 कोटीहून अधिक धानाचे चुकारे अदा

पणन विभागाची माहिती

भंडारा दि. 18 : आधारभूत किंमत धानखरेदी योजना खरिप पणन हंगाम 2023-24 अंतर्गत शासन निर्णयानुसार भंडारा जिल्ह्यामध्ये धान खरेदी सुरू आहे. ज्या धान खरेदी केंद्राच्या हुंड्या कार्यालयात जमा करण्यात आलेल्या आहे. त्यानुसार  दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी महानोंदणी ॲप व इतर खरेदी केंद्रावर एकूण 118837 शेतकऱ्यांची नोंदणी झालेली असून 47165 शेतकऱ्यांकडून 1641433.87 क्विंटलधान खरेदी झालेली आहे.

दिनांक 18 डिसेंबर 2023 अखेर 6630 शेतक-यांचे 1341531.27 क्विंटल धानाचे  55,41,56,492.92 रूपये चुकारे शेतक-यांना अदा करण्यात आलेले आहे. तसेच धान खरेदी करिता लागणारा बारदाना पुरविण्यात येत असून धानखरेदीबाबत तक्रारी नाहीत. असे जिल्हा पणन अधिकारी यांनी कळविले आहे.

अ. क्र.तालुकाशेतकरी संख्यारक्कमक्विंटल
1भंडारा47339303605.218004.4
2लाखांदूर1682147723173.467669.8
3लाखनी121592609190.742422.9
4मोहाडी28522830032.310458.1
5पवनी95285562030.139194.7
6साकोली177214510180566468.99
7तुमसर25121026656.29632
 एकूण6630554156492.9253850.89