महाराष्ट्र शासनाच्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाडमय पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका आमंत्रित

महाराष्ट्र शासनाच्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाडमय पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका आमंत्रित

          भंडारा,दि.3 : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाडमय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2023 करिता शासनाच्यातवीने देण्यात येणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाडमय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 1 जानेवारी,2024 ते 31 जानेवारी,2024 पर्यत पाठविता येणार आहेत.

        तसेच 1 जानेवारी,2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत.या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाटयमंदिर इमारत,दुसरा मजला,सयानी मार्ग, प्रभादेवी मुंबई 400025 यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यंत्र संबधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा विनामुल्य उपलब्ध होतील.

          महाराष्ट्र शासनाच्या www.maharastra.gov.in या संकेतस्थळावर नवीन संदेश या सदरात स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाडमय पुरस्कार 2023 नियमावली व प्रवेशिका या शीर्षाखाली व What s new या सदरात Late Yashwantrao  Chavan  State  Literature  Award 2023 Rules  Book and  Application  Form या शीर्षखाली  व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या सदरात स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाडमय पुरस्कार 2023 नियमावली व प्रवेशिका या शीर्षाखाली व What s new या Late Yashwantrao  Chavan  State  Literature  Award 2023 Rules  Book and  Application  Form या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील.

         तसेच प्रवेशिका पूर्णत भरुन आवश्यक साहित्याह सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील.प्रवेशिका पूर्णत : भरुन आवश्यक साहित्यासह सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात 1 जानेवारी,2024 ते 31 जानेवारी,2024 या विहित कालावधीत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात लेखक प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिक दाखल करुन शकतात.

         मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतीसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,रवींद्र नाटयमंदिर इमारत,दुसरा मजला,सयानी मार्ग,प्रभादेवी,मुंबई 400025 येथे पाठवाव्यात मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हे साहित्य 1 जानेवारी,2024 ते 31 जानेवारी,2024 या विहित कालावधीत पाठवावे,असे आवाहन सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी कळविले आहे.

           तसेच लेखक प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर पाकीटवर स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाडमय पुरस्कार 2023 साठी प्रवेशिका असा स्पष्ट उल्लेख करावा.प्रवेशिका व पुस्तके स्विकारण्याचा अंतिम 31 जानेवारी,2024 हा राहील.विहित कालमर्यादेनंतर 1 जानेवारी,ते 31 जोनवारी,2024 येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाहीत.यांची संबंधितांनी नोंद घ्यावी.