पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी घेतला जिल्हा नियोजन समितीच्या कामाचा आढावा

पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी घेतला जिल्हा नियोजन समितीच्या कामाचा आढावा

  • मत्स्य बीज निर्मिती केंद्राच्या कामाला चालना द्या
  • अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबतची अद्यावत माहिती

 लोकप्रतिनिधींना उपलब्ध करून देण्याचे निर्देश

भंडारा दि. 17 : जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या मस्त्यबीज निर्मिती प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आज दिले. पालकमंत्री श्री. गावित यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक  आज संपन्न झाली. यावेळी तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या जिल्ह्यामधून बीजनिर्मिती मोठ्या प्रमाणावर व्हावी व त्याद्वारे  मत्स्य उत्पादकांचे आर्थिक स्तर  उंचावून रोजगार निर्मितीसाठी या कामाला तातडीने चालना देण्याची निर्देश  पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिले.

या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जीभकाटे खासदार सुनील मेंढे, आमदार नाना पटोले, आमदार राजू कारेमोरे, आमदार नरेंद्र भोंडेकर, विशेष निमंत्रित परिणय फुके, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्यासह नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य उपस्थित होते.

जिल्हा नियोजन समितीच्या कामाची विस्तृत सादरीकरण नियोजन अधिकारी शशिकुमार बोरकर यांनी केले. बैठकीच्या शेवटी जिल्हा विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले तसेच जिल्ह्याचे आर्थिक व सामाजिक समालोचन या पुस्तकाचे प्रकाशन देखील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

मोगरा बांध पद्धतीने मत्स्य बीज निर्मिती करण्याविषयी चा मुद्दा यावेळी चर्चेत आला. मसी बीज निर्मितीच्या प्रकल्पाला चालना देण्यासाठी लवकरच  मत्स्य विभागाच्या  सचिवांसोबत बैठक घेवून जिल्हयाचा एक

 समग्र मत्स्य  विकास आराखडा तयार करण्याचे  निर्देश पालकमंत्री यांनी यावेळी दिले.

संरक्षण भिंत नसलेल्या शाळा तसेच मुला मुलींना शौचालय उपलब्ध नसलेल्या शाळांच्या बाबत तातडीने या कामांचे प्रस्ताव प्राथमिक शिक्षण विभागाने सादर करावे. आरोग्य विषयातील महत्त्वाचा विषय म्हणजे सिकलसेल रुग्णांसाठी विशेष शिबिर लावण्यात येऊन त्याद्वारे त्यांचे समुपदेशन करण्यात यावे व तपासणी करण्यात यावी असे निर्देश पालकमंत्री महोदयांनी यावेळी दिले यासाठी केंद्र तथा राज्याचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी आश्वस्त केले.

2011 आधीचे व नंतरचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबतच्या संबंधी अतिक्रमण झालेल्या जागांची संपूर्ण माहिती अद्यावत आकडेवारी सह गोळा करण्याची व ती माहिती जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शासनाला सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

ई पिक पाहणी ॲप  बंद झाल्याबाबत आमदार महोदयांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावर अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नोंदणी तांत्रिक अडचणीमुळे ईपिक मधे होत नाही, हे लक्षात घेता याबाबत लवकरच कृषी विभागाशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, असे श्री. गावित यांनी आश्र्वस्त केले.

जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयामधील मधील रेफर टू भंडारा करण्यात येणारे रुग्णांचे रेफरल ऑडिट करण्यात यावे, अशा सूचनाही लोकप्रतिनिधींच्या मागणीनंतर पालकमंत्र्यांनी दिल्या. सामाजिक न्याय विभागातर्फे प्रस्तावित असलेल्या मुला- मुलींच्या वस्तीगृहाचे काम तातडीने मार्गी लावावे व त्याबाबत येणाऱ्या पंधरा दिवसात कार्यवाही करण्याची सूचना श्री. गावीत यांनी सामाजिक न्याय विभागाला केली. यावेळी 2023- 24 च्या जिल्हा नियोजन समितीच्या योजनांचा खर्च आढावा तसेच 2024- 25 या वर्षासाठीच्या प्रारूप आराखड्याला सभेत  मंजुरी देण्यात आली.

या बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी तर संचलन व आभार जिल्हा नियोजन अधिकारी शशी कुमार बोरकर यांनी केले.