6 सप्टेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

6 सप्टेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

चंद्रपूर दि. 27 ऑगस्ट : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून लोकशाही दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्यात येते. या लोकशाही दिनानिमित्त नागरिक व शेतकरी तक्रार दाखल करू शकतात.

माहे सप्टेंबर या महिन्याचा पहिला सोमवार दि.6 सप्टेंबर 2021 रोजी येत असल्याने सदर लोकशाही दिनाचे आयोजन दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार सादर करतांना विहित नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत तसेच अर्ज सादर करावा. अर्ज सादर केल्यानंतरच तक्रार अर्ज स्वीकारण्यात येईल. निवेदन स्वीकारण्याची वेळ दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत राहील. सदर लोकशाही दिनामध्ये नागरिकांनी कोरोना वर्तणूक विषयक नियमांचे पालन करणे अनिवार्य राहील, असे निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन लोंढे यांनी कळविले आहे.