केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिप सिंग पुरी यांचा चंद्रपूर दौरा

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिप सिंग पुरी यांचा चंद्रपूर दौरा

चंद्रपूर, दि. 15: केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदिप सिंग पुरी आज ( दि.16 डिसेंबर) वरोरा तालुक्यात येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, दि. 16 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 2.55 वाजता वरोरा तालुक्यातील खेमजई येथे आगमन. दुपारी 3 वाजता कार्यक्रम स्थळी विविध स्टॉलची पाहणी. व लाभार्थ्यांशी संवाद साधतील. दुपारी 3:40 वाजता पत्रकारांशी चर्चा करतील. सायंकाळी 4.25 वाजता खेमजई (ता. वरोरा) येथून नागपूरकडे प्रयाण करतील.