मृत इसमाची ओळख पटविण्यासाठी पडोली पोलिस स्टेशनला संपर्क करण्याचे आवाहन

मृत इसमाची ओळख पटविण्यासाठी पडोली पोलिस स्टेशनला संपर्क करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 7 जून : पोलीस स्टेशन, पडोली हद्दीत मामा हॉटेलच्या बाजुला एमआयडीसी, चंद्रपूर येथे एक अनोळखी पुरुष व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आला आहे. मृत इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीस स्टेशन, पडोलीमार्फत करण्यात येत आहे.

सदर व्यक्तीचे वय अंदाजे 50 वर्ष असून सावळा रंग, उंची 5 फुट, दाढी व मिशी वाढलेली, अंगात  काळपट रंगाचा नाईट हाफ पँट परीधान केलेला आहे. वर्णनावरून सदर मृतक अनोळखी व्यक्तीला कोणी ओळखत असेल तर  पोलीस स्टेशन, पडोली तपास अधिकारी राजा शेट्टी 7972670136 या क्रमाकांवर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.