विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा ‘सुयोग’ येथे पत्रकारांशी अनौपचारिक दिलखुलास संवाद

विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा ‘सुयोग’ येथे पत्रकारांशी अनौपचारिक दिलखुलास संवाद

नागपूर, दि. १४ : विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज सुयोग पत्रकार निवास येथे भेट दिली व विविध माध्यम प्रतिनिधींसोबत मनमोकळा संवाद साधला.

सुयोग पत्रकार शिबीराचे प्रमुख दिलीप जाधव यांनी श्री. वडेट्टीवार यांचे स्वागत केले.

मागासवर्ग आयोगातील सदस्यांचा राजीनामा, शेतकऱ्यांचे प्रश्न,ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, पाच राज्यांमध्ये पार पडलेल्या निवडणुका अशा विविध विषयावर पत्रकारांशी संवाद साधला.

श्री. वडेट्टीवार म्हणाले,मागासवर्ग आयोगातील सदस्यांचा राजीनामा हा राजकीय दबावापोटी झाला आहे. सरकारला ओबीसी प्रतिनिधित्व करणारे लोक नको होते आणि
त्यात ते यशस्वी झाले. एका मागून एक सदस्यांनी दिलेल्या राजीनामा बाबत सभागृहात मुद्दा मांडणार असल्याच वडेट्टीवार यांनी सांगितले.

मराठा आरक्षण संदर्भात आपली भूमिका मांडताना वडेट्टीवार म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे.ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्याला विरोध नाही असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून शेतकरी प्रश्नावर विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र सरकार शेतकरी विषयावर अभ्यास करून शुक्रवारी उत्तर देणार असल्याचं टोमणा विरोधी पक्षनेते यांनी मारला..यावेळी सुयोग निवासी पत्रकार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.