अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्याना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती बाबत आवाहन

अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्याना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती बाबत आवाहन

भंडारा दि. 14 : राज्यातील सर्व अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती / फ्रिशिप चा लाभ देणे करीता महाराष्ट्र शासनाने Mahadbtmahait.gov.in हे ONLINE पोर्टल सुरु केलेले आहे. शैक्षणिक सत्र 2023-2024 करीता ज्या आदिवासी विद्यार्थ्यांनी इयता 11 वी व त्या पुढील शिक्षणा करीता शासन / विद्यापीठ मान्यता प्राप्त शाळा /महाविद्यालय / संस्थेत प्रवेश घेतला असेल अश्या विद्यार्थ्यांनी पोर्टलवर ON LINE अर्ज सादर करणे सुरु झालेले आहे.

तरी विद्यार्थ्यांनी प्रवेशित महाविद्यालयास ON LINE अर्ज सदर वेळेत भरावे. ONLINE अर्ज सादर करताना शिष्यवृत्ती करीता आवश्यक सर्व कागदपत्रे जसे बोनाफाईड प्रमाणपत्र, विद्यार्थ्याचे जातीचे प्रमाणपत्र, मागील वर्षाची गुणपत्रीका, विद्यार्थ्याचे स्वताःचे डोमेशिअल प्रमाणपत्र, वडीलांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र/विवाहीत विद्यार्थीनींचे पतीचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (शिष्यवृत्ती करीता उत्पन्नाची मर्यदा 2,50,000/-) इत्यादी कागदपत्रे दिनांक 31/01/2024 पर्यत अपलोड करावी, जेणे करुन शिष्यवृत्ती / फ्रिशिपचा लाभ घेणे शक्य होईल तसेच शाळा /कॉलेज व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांचे ON LINE भरलेले अर्ज तपासुन, परिपुर्ण अर्ज तातडीने या कार्यालयास ON LINE सादर करावे.

सदर पोर्टल 31/01/2024 पर्यत सुरु राहणार असल्याने विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज सादर करावे व सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहान प्रकल्प अधिकारी, निरज मोरे यांनी केले आहे.