कोरची येथील विविध दारुच्या गुन्ह्यातील एकुण ६,८०,४५०/- रुपयाचा जप्त मुद्देमाल केला नष्ट

कोरची येथील विविध दारुच्या गुन्ह्यातील एकुण ६,८०,४५०/- रुपयाचा जप्त मुद्देमाल केला नष्ट

गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असतांना अवैधरीत्या दारुची वाहतुक केली जाते. त्याअनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल सा. यांचे आदेशान्वये पोस्टे कोरची हद्यीतील अवैध दारु विक्री करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात आलेली होती. त्यानुसार पोस्टे कोरची येथील महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये ४९ गुन्ह्यातील एकुण किंमत ६,८०,४५०/- रुपयाचा जप्त करण्यात आलेला मुद्देमाल दिनांक ०५/१२/२०२३ रोजी नष्ट करण्यात

आला.

सविस्तर वृत्त असे आहे की, मा. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गडचिरोली यांचे परवानगीने दिनांक ०५/१२/२०२३ रोजी पोस्टे कोरचीचे पोलीस निरीक्षक श्री. अमोल फडतरे यांनी राज्य उत्पादक शुल्क, गडचिरोली विभागाचे दुय्यम निरीक्षक श्री. चं. वि. भगत यांच्यासह पोस्टे कोरची हद्दीतील विविध दारुबंदी गुन्ह्यातील जप्त मुद्येमाल नष्ट केला. ज्यात १) देशी दारुच्या १८० मिली मापाच्या ४४९ बाटल्या २) देशी दारुच्या ९० मिली मापाच्या ४०४७ बाटल्या ३) विदेशी दारुच्या १८० मिली मापाच्या २६०९ बाटल्या ४) ६५० मिली मापाच्या बियरच्या २०२ बाटल्या ५) ५०० मिलीच्या बियरच्या १३० टिनाचे कॅन ६) ३३० मिली मापाच्या बियरच्या ६१ बाटल्या याप्रमाणे एकूण ७४९८ बाटल्याचा मुद्देमाल जेसीबिच्या सहाय्याने १० x १० चा खोल खड्डा खोदुन रोड रोलरच्या सहाय्याने कडक व मुरमाळ जागेवरती मुद्देमाल पसरवून काचेच्या व प्लॉस्टीकच्या बॉटलांचा चुरा करण्यात आला व काचेचा चुरा व प्लॅस्टीकच्या चेपलेल्या बाटल्या जेसीबीच्या फावड्यांच्या सहाय्याने खड्यात टाकण्यात आला. सदर मुद्येमालाची विल्हेवाट लावतांना पर्यावरणाची हानी होणार नाही याची पुर्णपणे दक्षता

घेण्यात आली.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक

(प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलिस अधीक्षक (अभियान) श्री. कोश देशमुख सा., मा. अपर

पोलीस अधीक्षक अहेरी श्री. एम. रमेश सा. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. साहील झरकर

यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे कोरची येथील प्रभारी अधिकारी अमोल फडतरे, मपोउपनि. आसावरी शेडगे, परी.

पोउपनि योगेश पवार व सर्व अंमलदार यांचे उपस्थीतीत पार पडली.