गडचिरोली पोलीस दलाने केले एका जहाल माओवाद्यास अटक

गडचिरोली पोलीस दलाने केले एका जहाल माओवाद्यास अटक

• महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण ०२ लाख रुपयांचे बक्षीस.

दिनांक ०२ ते ०८ डिसेंबर रोजी दरम्यान माओवादी हे पीएलजीए सप्ताह साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलीस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळा आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात.

दिनांक ०६/१२/२०२३ रोजी जहाल माओवादी नामे महेन्द्र किष्टय्या वेलादी, वय ३२ वर्षे, रा. चेरपल्ली, तह. भोपालपट्टनम, जि. बीजापूर (छत्तीसगड) हा उपपोस्टे दामरंचा जवळ असलेल्या इंद्रावती नदीजवळ पोलीस पार्टीच्या हालचालींबाबतची माहीती देण्याच्या उद्देशाने फिरत असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे विशेष अभियान पथकाचे जवान, सीआरपीएफ ९ बटालियन जी कंपणीचे जवान व उपपोस्टे दामरंचा पोलीस पार्टीच्या जवानांनी माओवाद विरोधी अभियान राबवून त्यास अटक केली. अधिक तपासात असे दिसून आले की, तो दामरंचा व मन्नेराजाराम या दोन्ही पोस्ट पार्टीच्या जवानांच्या नियमित कामकाजाच्या हालचालींचर पाळत ठेवून त्यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने अहेरी दलमच्या माओवाद्यांना माहिती पुरवीत होता. त्याचा २०२३ च्या सुरवातीला झालेल्या कापेचंचा ते नैनेर जंगल परिसरात वन अधिकाऱ्यांवर दरोडा, हल्ला आणि जाळपोळ करण्याच्या घटनेमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता हे उघड झाले आहे. त्यानुसार त्यास उपपोस्टे राजाराम (खां) तह. अहेरी, जि. गडचिरोली येथे दाखल अप. क्र. ०१/२०२३ कलम ३९७, ३३२, ३५३, ३४१, ३२४, ३२३, १२० (च), ४२७, ४३५, १४३, १४७, १४८, १४९, ५०६, १८६ भादवी, ३/२५ भारतीय हत्यार कायदा, १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा व ०७ क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अन्वये गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.

अटक जहाल माओवादी सदस्याबाबत माहिती

नामे महेंद्र किष्ट्या वेलादी

> दलममधील कार्यकाळ

सन २००९ मध्ये त्याने माओवाद्यांच्या सप्लाय टीमचा सदस्य म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि माओवादी चेरपल्ली जंगल परिसरात आल्यानंतर तो त्यांची सेंट्री ड्युटी करायचा.

तो सन २०१० पासून नॅशनल पार्क, बीजापूरच्या सॅण्ड्रा भागात सीपीआय (एम.) चा चेरपल्ली आरपीसीचा (रक्षा पार्टी कमीटी) सदस्य होता.

त्यानंतर तो नॅशनल पार्क एरिया, बीजापूर येथील सैंण्ड्रा दलममध्ये सदस्य म्हणून काम करत होता.

> कार्यकाळात केलेले गुन्हे

चकमक – ०२

माहे डिसेंबर २०१७ मध्ये मौजा सॅण्ड्रा जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये सहभाग.

माहे डिसेंबर २०२२ मध्ये गडचिरोली आणि बीजापूर पोलीसांच्या संयुक्त पथकासोबत मौजा टेकामेट्टा जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये सहभाग.

> जाळपोळ – ०१

सन २०२३ मध्ये मौजा कापेवंचा ते नैनेर जाणाऱ्या रोड जंगल परिसरात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना

मारहाण व त्यांचे वाहन जाळपोळीच्या गुन्ह्यात सहभाग.

• खून – ०१

• माहे मे २०२३ रोजी सॅण्ड्रा गावातील एका निरपराध इसमाच्या हत्येमध्ये सहभाग.

> शासनाने जाहिर केलेले बक्षीस.

महाराष्ट्र शासनाने महेंन्द्र किष्टय्या वेलादी याच्या अटकेवर ०२ लाख रुपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकूण ७२

माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. एम. रमेश सा. यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली, तसेच मा. पोलीस अधीक्षक यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.