जिल्हा कृषि महोत्सव कार्यक्रमात खरेदीदार व विक्रेता संमेलन कार्यक्रमाचे आयोजन

जिल्हा कृषि महोत्सव कार्यक्रमात खरेदीदार व विक्रेता संमेलन कार्यक्रमाचे आयोजन
गडचिरोली, दि.24: आज दिनांक २४ जानेवारी २०२४ रोजी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्यग्रामीण जीवन्नोनती अभियान (उमेद) , महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), आणि नाबार्ड यांचे संयुक्त विद्यमानेआयोजीत जिल्हा कृषि महोत्सव २०२३-२४ कार्यक्रमात खरेदीदार व विक्रेता संमेलनाचे आयोजन करण्यात आले.
आजच्या कार्यक्रमाच्याअध्यक्षा श्रीमती प्रज्ञा गोळघाटे, नोडल अधिकारी, विभागीय अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट प्रकल्प, नागपुर विभाग, नागपुर , प्रमुख पाहुणे पंढरी डाखळे, प्रकल्प संचालक, आत्मा, गडचिरोली, बसवराज मास्तोळी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली, श्री.गाडगे, उपायुक्त , पशुसंवर्धन विभाग, इशुलालजी काब्रा, अध्यक्ष, राईल मिलर्स असोसीशन, गडचिरोली, श्रीमती अर्चना राऊत, नोडल अधिकारी, जिल्हा अंमलबजावणी कक्ष, गडचिरोली, प्रफुल भोपये, जिल्हा अभियान व्यवस्थापक, उमेद, अरुण वसवाडे, तंत्र अधिकारी, जि.अ.कृ.अ.कार्यालय गडचिरोली, प्रमुख मार्गदर्शक सुभाष रहांगडाले, सनदी लेखापाल, TSR Associates, Nagpur, प्रवीण वानखेडे, संचालक, युनिव्हर्स एक्स्पोर्ट , प्रवीण भोंगाडे, संचालक, हिमालया अ‍ॅग्रो , श्रीमती प्रतिभाताई चौधरी, अजय तायवाडे, हे उपस्थित होते.
आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती प्रज्ञा गोळघाटे, नोडल अधिकारी, विभागीय अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट प्रकल्प, नागपुर विभाग, नागपुर यांनी गडचिरोली जिल्ह्यातील समुदाय आधारीत संस्थानी स्मार्ट प्रकल्पाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना श्रीमती अर्चना राऊत, नोडल अधिकारी, जिल्हा अंमलबजावणी कक्ष, गडचिरोली, यांनी केली. गडचिरोली जिल्ह्याचा मागासलेला जिल्हा म्हणुन असलेले नाव खोडुन काढायचे असल्यास जास्तीत जास्त संख्येने शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्मार्ट प्रकल्पाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच आज आयोजीत खरेदीदार व विक्रेता संमेलनाचे उद्देश सांगितले. अरुण वसवाडे, तंत्र अधिकारी, जि.अ.कृ.अ.कार्यालय गडचिरोली यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजनेविषयी सखोल मार्गदर्शन केले.
प्रवीण वानखेडे, संचालक, युनिव्हर्स एक्स्पोर्ट यांनी भाजीपाला, फळे व धान्य निर्यातीविषयी मार्गदर्शन केले. सुभाष रहांगडाले, सनदी लेखापाल, TSR Associates, Nagpur यांनी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना, कार्य, सक्षमीकरण व लेखा विषयक मार्गदर्शन केले. प्रवीण भोंगाडे, संचालक, हिमालया अ‍ॅग्रो यांनी निर्यात विषयक मार्गदर्शन केले.
आजच्या खरेदीदार व विक्रेता संमेलनात १० खरेदीदार व ५० विक्रेत्यांनी सहभाग घेतला. यावेळेस विक्रेत्यांनी त्यांच्याकडे विक्रीकरीता उपलब्ध असलेले तृनधान्य, कडधान्य व प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे नमुने सोबत आणले होते. कृषि महोत्सवाच्या दोन दिवसात चार हजार पेक्षा जास्त शेतकरी व महिलांनी महोत्सवास भेट दिली. असे प्रकल्प संचालक, आत्मा, गडचिरोली यांनी कळविले आहे.