स्थानिक गुन्हे शाखेच्या कौशल्याने घरफोडीचे पाच गुन्हे उघड

स्थानिक गुन्हे शाखेच्या कौशल्याने घरफोडीचे पाच गुन्हे उघड

स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा चे HC अजय बारापात्रे, सतिश देशमुख, संदीप मते, PN शैलेश बेदुरकर, बंडी मडावी, योगेश पेठे, आशीष तिवाडे, लक्ष्मी कापगते हे पेट्रोलींग करीत असताना संशयीतरित्या फिरत असलेला एक इसम आढळुन आला. त्याचे नाव गाँव विचारले असता त्याने त्याचे नाव गुरुदेव ऊर्फ मिरची खुशाल जांभुळे, वय 19 वर्ष, रा. जय दुर्गा नगर, भांडेवाडी, पारडी, नागपूर, ह. मु. घनशाम लिमजे यांचे घरी गांधी चौक भंडारा, जि. भंडारा असे सांगीतल्याने त्याचेवर यापुर्वी नागपूर जिल्ह्यात मालमत्तेचे गुन्हे दाखल असल्याने मा. पोलीस अधीक्षक श्री. लोहित मतानी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे व PI नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात आरोपीस विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सन 2023 मध्ये कोथुर्णा टोली, भंडारा शहर, अड्याळ व लाखांदूर जवळील दोन गावात घरफोड्या केल्याचे कबुल केले. सदर पोलीस स्टेशन च्या अभीलेखाची पाहणी केली असता (1) पो. स्टे. वरठी अप. क्र. 41/23 कलम 454, 380 भा. दं. वि. (2) पो. स्टे. भंडारा अप. क्र. 302/23 कलम 454, 457, 380 भा. दं. वि. (3) पो. स्टे. भंडारा अप. क्र. 618/23 कलम 457, 380 भा. दं. वि. (4) पो. स्टे. अड्याळ अप. क्र. 198/23 कलम 457, 380 भा. दं. वि, (5) पो. स्टे. लाखांदूर अप. क्र. 287/23 कलम 454,

457, 380 भा. दं. वि, असे पाच गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 13 ग्रॅम सोने, घरगुती सामान व नगदी 1,000/- असा एकुण 45,600/- रु चा मुद्देमाल त्याच्या राहते घरातुन जप्त करुण आरोपी नामे गुरुदेव ऊर्फ मिरची खुशाल जांभुळे, वय 19 वर्ष, रा. जय दुर्गा नगर, भांडेवाडी, पारडी, नागपूर, ह. मु. घनशाम लिमजे यांचे घरी चौक भंडारा यास पोलीस स्टेशन भंडारा च्या ताब्यात पुढील कारवाई करीता देण्यात आले.

गांधी सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. लोहित मतानी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात वरील सर्व नमुद पोलीस अधिकारी व अमलदारांनी अथक परिश्रम व कौशल्यपुर्ण तपास करुन आरोपीस ताब्यात घेवुन भंडारा जिल्ह्यातील एकुण पाच गुन्ह्याची उकल केली.