पर्यटन संचालनालयाच्या “आई” पर्यटन धोरणामुळे महिलांना उद्योजिका बनण्याची संधी

पर्यटन संचालनालयाच्या “आई” पर्यटन धोरणामुळे महिलांना उद्योजिका बनण्याची संधी

गडचिरोली,दि.01: पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या दृष्टीकोनातून महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी आई महिला केंद्रीत पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे. सदर धोरण पर्यटन संचालनालय व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ द्वारे राबविण्यात येणार आहे. या धोरणामध्ये महिलांसाठी पर्यटन विकास धोरणाची पंचसुत्री जाहीर केली असून महिलांना आर्थिक सक्षमकरण्यासाठी वेगवेगळया सवलती दिल्या जाणार आहेत. या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कृती आराखडा तयार करुन उपाययोजना सुचविणे व सहनियंत्रण करण्यासाठी पर्यटन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यदल समिती स्थापन करण्यात आली आहे. अ) पर्यटन संचालनालया मार्फत देण्यात येणारी प्रोत्साहन व सवलती
पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकाचा सहभाग वाढविण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यातील पर्यटन संचालनालयकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालविलेल्या १० पर्यटन व्यवसायांना(होमस्टे, हॉटेल, रेस्टोरेंट, टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल कॅराव्हॅन, बिच शॅक, साहसी पर्यटन(जमिन, हवा, जल) पर्यटक सुविधा केंद्र, कृषी पर्यटन केंद्र, होम स्टे, बी अॅण्ड बी, रिसार्ट, मोटेल, हाऊस बोट, टेंट, ट्री हाऊस, पर्यटनव्हिला, एजन्सी इ.)पर्यटन व्यवसाय उभारणीसाठी मान्यता प्राप्त बँकामार्फत घेतलेल्या रु. १५ लाख पर्यंतच्या कर्जाच्या रकमेवरील व्याजाची रक्कम १२% मर्यादेत त्याच्या आधार लिंक बँक खात्यात पुर्ण कर्ज परतफेड होई पर्यंत किंवा ७ वर्षे कालावधीपर्यंत किंवा व्याजाची रक्कम रु.४.५ लक्षच्या मर्यादेपर्यंत, या तीन पर्यायापैकी जे आदी घडेले तो पर्यंत, दरमहा खालील अटींच्या अधिन राहुन जमा करण्यात येईल.
१) पर्यटन व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत आला पाहिजे.
२) पर्यटन व्यवसाय महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालविलेल्या असला पाहिजे.
३) महिलांच्या मालकीच्या हॉटेल/रेस्टॉरंट्समध्ये ५०% व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी महिला असणे
आवश्यक राहील.
४) महिलांच्या मालकीच्या टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल एजन्सी मध्ये ५०% कर्मचारी महिला असणे आवश्क राहील.
५) पर्यटन व्यवसायाकरीता आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त असाव्यात.
६) कर्जाचे हप्ते वेळेत भरले पाहिजे.
पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत पर्यटन व्यवसायामध्ये कार्यरत असलेल्या महिलांना केंद्र/
राज्य शासनाच्या विमा योजनेमध्ये सहभागी करुन त्यांचा वार्षिक विमा हप्ता पहिले ०५ वर्षे शासना मार्फत
भरण्यात येईल. ब) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत प्रोत्साहन व सवलती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे औरंगाबाद येथील पर्यटक निवास, राज्यातील प्रथम पूर्णत: महिला संचालित पर्यटक निवास म्हणून व खारघर रेसिडोन्सीचे अर्का रेस्टॉरंट पूर्णत: महिला संचालित रेस्टॉरंट म्हणून चालविण्यात येईल. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या टुर ऑपरेटर मार्फत आयोजित पर्यटन सर्किट/ पॅकेजेस मध्ये महिला पर्यटकांना २०% सुट देण्यात येईल. या २०% सवलतीची रक्कम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे टुर ऑपरेटरला दिली जाईल. खर्चाची प्रतीपुर्ती महामंडळास शासनाकडुन करण्यात येईल. महामंडळाच्या रिसोर्ट/युनिट्स मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्य ०१ ते ०८ मार्च या कालावधीत
तसेच वर्षाभरात इतर २२ दिवस अश्याप्रकारे एकुण ३० दिवस फक्त ऑनलाईल बुकिंगमध्ये ५०% सुट देण्यात येईल.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मालमत्यांच्या ठिकाणी महिला बचत गटांना हस्तकला,कलाकृती, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ इत्यादींच्या विक्रीसाठी स्टॉल/जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. नागपूर विभागातील सर्व पर्यटन महिला उद्योजकांनी जे हॉटेल रिसॉर्ट, होम स्टे, कृषी पर्यटन केंद्र, साहसी पर्यटन केंद्र, उपहारगृह, टुर गाईड, टुर ऑपरेटर अशा पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या / नविन व्यवसाय करु इच्छित असलेल्या महिला उद्योजकानी व्याजाचा परतावा घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज करण्याचे आवाहन उपसंचालक प्रशांत सवाई यांनी केले आहे.