बँक ऑफ इंडिया स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत शेळीपालनाचे नि:शुल्क प्रशिक्षण Ø ग्रामीण भागातील उमेदवारांना लाभ घेण्याचे आवाहन

बँक ऑफ इंडिया स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत

शेळीपालनाचे नि:शुल्क प्रशिक्षण

Ø ग्रामीण भागातील उमेदवारांना लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 13 सप्टेंबर: बँक ऑफ इंडिया द्वारा संचालित स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर मार्फत दि. 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2021 या कालावधीत नि:शुल्क शेळीपालन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. उमेदवारास राहण्याची व जेवणाची व्यवस्था मोफत उपलब्ध आहे. तरी प्रशिक्षणास इच्छुक उमेदवारांनी उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक मिलिंद इंगळे यांनी केले आहे.
      प्रशिक्षणास इच्छुक उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी दाखला, रोजगार हमीच्या कामावर असल्यास प्रत, बीपीएल दाखला, पासपोर्ट आकाराचे चार फोटो, रेशन कार्ड, मतदान कार्ड व आधार कार्डची प्रत इत्यादी आवश्यक कागदपत्रे घेऊन स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, डी एड कॉलेज, रेल्वे उड्डाण पुलाच्या खाली, बल्लारपूर रोड, बाबुपेठ, चंद्रपूर येथे दि. 22 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता मुलाखतीस उपस्थित राहून आपली जागा निश्चित करावी.
स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने उद्योग धंद्यासाठीचे मार्गदर्शनपर कार्यक्रम दर आठवड्यात तसेच दर महिन्यात आयोजित केले जातात. ग्रामीण भागातील उमेदवारांनी संधीचा लाभ घ्यावा तसेच प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी 8308643200 व 9730760906 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थचे संचालक मिलींद इंगळे यांनी कळविले आहे.