काढणी पश्चात पिकाचे नुकसान असल्यास पीकविमा कंपनीस पूर्वसूचना द्यावी

काढणी पश्चात पिकाचे नुकसान असल्यास पीकविमा कंपनीस पूर्वसूचना द्यावी
प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम 2023-24

गडचिरोली,दि.30:सध्या जिल्हयात अवकाळी पाऊस सुरू आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत काढणी पश्चात नुकसान या बाबी अंतर्गत विमा संरक्षीत क्षेत्र नुकसानग्रस्त झाल्यास त्या अधिसूचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते. काढणी पश्चात नुकसान या घटकांतर्गत भात पिकाच्या काढणीनंतर शेतात कापणी करून पसरवून अथवा पेंढया बांधून सुकवणी करणे आवश्यक असते. कापणी / काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या भात पिकाचे काढणीनंतर २ आठवडयांच्या आत (१४ दिवस) अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून योजनेच्या निकषांचे अधिन राहून नुकसान भरपाई निश्चित केली जाते.
काढणी पश्चात नुकसान या जोखीमेतंर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्व्हे नंबर नुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत नुकसानीबाबतची सूचना हि खालील टोल-फ्री क्रमांकावर तसेच पिक विमा कंपनीच्या इमेल वर करावी.

अ.क्र. जिल्हा विमा कंपनी टोल फ्री क्रमांक
१. गडचिरोली रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं. लि. १८००१०२४०८८

विमा कंपनीचा ई-मेल – rgicl.maharashtraagri@relianceada.com

विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय, कृषि विभागाचे तालुका कृषि अधिकारी कार्यालय व ज्या बँकेत विमा जमा केला ती बँक शाखा, इत्यादी. द्वारे नुकसानीबाबतची पूर्वसूचना दिल्यानंतर वैयक्तिक स्तरावर नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे.विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी तसेच तालुका प्रतिनिधी यांचे नावे व मोबाईल क्रमांक खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे.
Block Candidate’s Full name Designation Mobile number
Vadsa Vishal BisanLumbhalkar Block coordinator 9579406464
Dhanora NileshWasekar Block coordinator 8390276633
Mulchara Rajesh Guntiwar Block coordinator 7588958869
Bhamragd SurajRaut Block coordinator 9545388280
Korchi VikeshUndirwade Block coordinator 9404231809
Kuekheda SandipAtram Block coordinator 9405318910
Armori Vishal Sapate Block coordinator 8275677938
Chamorshi Mahesh Sattarwar Block coordinator 9657052464
Gadchiroli Rahul ArunNandanwar Block coordinator 9404464886
Sironcha RavindraNasani Block coordinator 9490483145
Etapalli Ganesh Gondhralkar Block coordinator 9404067206
Chamorshi SantoshShrawanNayamkar Block coordinator 9765629829
Gadchiroli AshishyogendraChaple District co- ordinator 7218186094

अवकाळी पावसामुळे भात पिकाचे काढणीनंतर ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत विमा कंपनीला पूर्वसूचना द्याव्यात, असे आवाहन बसवराज मास्तोळी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.