पोस्टे मुलचेरा पोलीसांनी अवैध दारुसह केला ७,७६,२००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोस्टे मुलचेरा पोलीसांनी अवैध दारुसह केला ७,७६,२००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

• दारू वाहतुकीसाठी आरोपीची लढवलेली शक्कल पोलीसांनी केली उघड.

गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी अवैद्य दारु विक्रीवर अंकुश लावण्याबाबत दिलेल्या आदेशान्वये काल दिनांक २५/११/२०२३ रोजी सकाळी ०६ वा. एक पिकप नंबर एम. एच. ३४ बि. झेड. ३१५७ या वाहनातुन अवैधरित्या दारु विक्री होत असल्याची गोपनिय माहिती मिळाली असल्याने पोस्टे मुलचेरा येथील अधिकारी अंमलदार यांनी नाकाबंदी करुन ये-जा करणा-या वाहनास थांबवुन सदर वाहनाची तपासणी केली असता व वाहनाचे डाल्यामधील काही भाग हा वेल्डिींग करुन त्याच्या आतमध्ये काही बॉक्स ठेवलेले दिसुन आले तसेच सदर वाहनाची पाहणी केली असता सदर बॉक्समध्ये देशी व विदेशी दारु मिळून आले.

सदर तपासणी दरम्यान १) रॅकेट देशी दारु प्रवरा डिस्टिलरी कंपनीचे ३१ बॉक्स प्रति मध्ये ९० एम. एल. मापाचे १०० निषा असे एकुण ३१००, प्रतिनग ७० रुपये प्रमाणे, किंमत २ लाख १७ हजार रुपये, २) इम्पेरियल ब्ल्यु कंपनीचे ०४ बॉक्स प्रति बॉक्स मध्ये ७५० एम. एल. मापाच्या १२ बॉटल असे एकूण ४८ बॉटल प्रति बॉटल विक्री किंमत १४०० रुपये प्रमाणे किंमत ६७,२०० रुपये, ३) हायवर्ड ५००० बियर कंपनीचे तीन बॉक्स प्रति बॉक्स मध्ये ५०० एम. एल. मापाच्या २४ कॅन एकुण ७२ कॅन प्रति विक्री किंमत ३५० रुपये प्रमाणे २५,२०० रुपये, ४) दुबर्ग स्ट्राँग बियर कंपनीचे दोन बॉक्स प्रति बॉक्स मध्ये ५०० एम. एल. मापाच्या २४ कॅन असे एकुण ४८ कॅन प्रति कॅन विक्री किंमत ३५० रुपये प्रमाणे किंमत १६,८०० रुपये, ५) एक टाटा योध्दा १७०० कंपनीचे चार चाकी वाहन क्रमांक एम. एच. ३४ बी. झेड. ३१५७ किंमत अंदाजे ४,५०,०००/- हजार रुपये असा एकुण अंदाजे ७,७६,२००/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच सदर

आहे. फरार आरोपी अरविंद निवेलकर राहणार जंगम वस्ती चंद्रपुर ह. मु. घोट ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील असुन फरार आरोपीचे शोध घेणे सुरु आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे मुलचेरा येथील पोउपनि संदिप ठाकरे हे करीत आहेत.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) श्री. एम. रमेश सा. व उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे मुलचेरा प्रभारी अधिकारी सपोनि. अशोक भापकर व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.

तसेच यावेळी मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी सांगितले की, गडचिरोली पोलीस दल हे आरोपीच्या नेहमीच एक पाऊल पुढे चालत आहे. सदर वेळी आरोपीने खुप शक्कल लढवुन पोलीसांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचा प्रयत्न केला परंतु गडचिरोली पोलीस दलाने त्यांचा तो प्रयत्न हाणून पाडला आहे. तसेच जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन केले की, जिल्ह्यात कुठेही अशा पद्धतीने होत असलेल्या अवैध दारु अथवा तत्सम अंमली पदार्थाच्या वाहतुकीबद्दल माहिती मिळताच गडचिरोली पोलीस दलाशी संपर्क साधावा.