अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकरीता स्पर्धा पुर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकरीता
स्पर्धा पुर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

गडचिरोली,दि.22: आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, गडचिरोलीच्या वतीने जिल्यातील अनुसुचित जमातीच्या उमेदवांराकरीता MPSC पुर्व प्रशिक्षण, जिल्हा निवड समीतीच्या विविध पदभरती बाबत तसेच IBPS, SSC च्या परीक्षा बाबत स्पर्धा पुर्व प्रशिक्षण कार्यक्रम विनामुल्य राबविण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण घेऊ इच्छीणा-या उमेदवांराकडे शालांत परीक्षा उतीर्ण प्रमाणपत्र व रोजगार नोंदणी कार्ड (EMPLOYMENT CARD ) असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महीने आहे. प्रशिक्षणा दरम्यान रु.1000 ( एक हजार रुपये ) दरमहा विदयावेतन दिले जाईल. प्रशिक्षण पुर्ण करणा-या उमेदवांराना चार पुस्तकांचा संच व प्रमाणपत्र देण्यात येते. कार्यालयात अर्ज विनामुल्य उपलब्ध आहेत. तसेच अर्ज दि.28 नोव्हेंबर 2023 पर्यत या कार्यालयात सादर करावेत तदनंतर मुलाखत दि.29 नोव्हेंबर 2023 रोजी आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, शासकीय संकुल बॅरेक क्र.2 गडचिरोली येथे घेण्यात येणार आहे. त्याकरीता उपस्थ‍ित राहावे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 07132-295143/8485814488 या क्रमाकांवर संपर्क साधावा. असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले आहे.