पोलीस स्टेशन सिंदेवाही तर्फे जामा मज्जिद येथे बैठक व इफ्तार पार्टी…

पोलीस स्टेशन सिंदेवाही तर्फे जामा मज्जिद येथे बैठक व इफ्तार पार्टी…

रमजान ईद उत्सवानिमित्याने काल सायंकाळी जामा मज्जिद सिंदेवाही येथे बैठक संपन्न झाली.
बैठकीत मुस्लिम कमेटीचे अध्यक्ष चांद शेख,मोजन रहेमान खान पठान, मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.
सिंदेवाही पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक योगेश घारे यांनी शासनाने दिलेल्या उत्सव संबंधीचे दिशा निर्देश समजावून सांगितले. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चर्चा करण्यात आली.
सोशल मीडियावर कोणतेही आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये. व सोशल मीडियावर आलेल्या फेक मेसेज संबंधाने कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये व शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
रमजान ईद चे अनुषंगाने मुस्लिम बांधवांकडून जातीय सलोखा व बंधुभाव निर्माण व्हावा याकरिता बैठक घेऊन इफ्तार पार्टी देण्यात आली होती.

याप्रसंगी यूनुस शेख नगसेवक,सुभान पठान, सलाम बाबू कुरेशी, अताउल्ला खान पठान,जावेद पठान,अंसारी सर ,अमन कुरेशी,आदील पठान व मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.