संगणक परिचालकांची दिवाळी झाली अंधारात

संगणक परिचालकांची दिवाळी झाली अंधारात

◾आजपासून सर्व संगणक परिचालक बेमुदत संपावर..
◾ ग्राम पंचायत कामकाजावर विपरीत परिणाम.

सिंदेवाही : राज्यातील शासनाचा आपले सरकार, सेवा प्रकल्प हा नावारूपास आलेला उपक्रम संगणक परिचालक यांचे भरवशावर सुरू असून या संगणक परिचालकांची दिवाळी मानधनाविना अंधारात गेली असून मागील वर्षभरापूर्वी दिलेल्या आश्वासनाची सरकारने पूर्तता न केल्याने राज्यातील सर्व संगणक परिचालक सोमवार पासून बेमुदत संपावर गेल्याने ग्राम पंचायत चे कामकाजावर विपरीत परिणाम होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
राज्यात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करीत असताना राज्यातील संगणक परिचालक यांना त्यांच्या हक्काचे मानधन न मिळाल्याने त्यांची दिवाळी अंधारात तर गेलीच मात्र संगणक परिचालक यांचेवर उपासमारीची पाळी आली. राज्य शासनाने मागील डिसेंबर मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात संगणक परिचालक यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्या संदर्भात लेखी आश्वासन दिले असताना वर्षभरात त्याची कोणतीही मागणी मंजूर झालेली नाही. त्यामुळे संगणक परिचालक संघटनेकडून राज्यव्यापी कामबंद आंदोलन करण्यात आले. दरम्यान सिंदेवाही तालुका संगणक परिचालक संघटनेकडूनसींदेवाहीचे गट विकास अधिकारी यांचे मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबतचे निवेदन देऊन तालुक्यातील सर्व संगणक परिचालक यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामूळे तालुक्यातील ग्राम पंचायत चे सर्व कामकाज यामुळे प्रभावित झाले असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. त्यामुळे राज्यशासनाने संगणक परिचालक यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात अशी मागणी संघटनेचे तालुकाध्यक्ष महेश जांभूडे , उपाध्यक्ष अविनाश नन्नावरे, सचिव दिनेश मांदाडे, यांचे नेतृत्वात तालुक्यातील सर्व संगणक परिचालक यांचेकडून करण्यात आली आहे.