राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांचा पदाधिकारी- कार्यकर्ता संवाद मेळावा

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांचा पदाधिकारी- कार्यकर्ता संवाद मेळावा

चंद्रपूर :- राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनिलजी तटकरे साहेब यांचा विदर्भ दौरा सुरु असून निर्धार नवपर्वाचा पदाधिकारी कार्यकर्ता संवाद मेळावा दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ३. ०० वाजता एन. डी. हॉटेल, नागपूर रोड, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

या मेळाव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. खा.श्री. सुनिल तटकरे, मा. ना. श्री. धर्मरावबाबा आत्राम मंत्री अन्न व औषधी प्रशासन विभाग , प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस सौ. रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. सुरज चव्हाण, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. प्रशांत कदम यांचेसह इतर मान्यवरांची उपस्थिती राहणार असून हे कार्यकत्यांशी संवाद साधणार आहेत.

यावेळी या संवाद मेळाव्यात चंद्रपूर जिल्हयातील आजी-माजी प्रदेश प्रतिनिधी, सर्व विधानसभा अध्यक्ष, सर्व तालुका व शहर अध्यक्ष, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, नगर पंचायतचे पदाधिकारी / नगर पंचायत सदस्य, आजी-माजी जि.प.सदस्य, आजी माजी पंचायत समितीचे सभापती व पंचायत समिती सदस्य, जिल्हा कार्यकारीणीचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आजी माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, महिला, युवक, युवती, राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष व कार्यकारिणीचे पदाधिकारी, ओ.बी.सी. सेल, सामाजिक न्याय विभाग, अल्पसंख्यांक सेल, सांस्कृतिक सेल, व्यापार सेल, सेवादल, व्हीजेएनटी सेल व डॉक्टर सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी, तसेच माजी नगर परीषद सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, ही सविनय विनंती