चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी उठली तेव्हापासून अपघातात वाढ….

चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी उठली तेव्हापासून अपघातात वाढ….

संपादक – मिथुन मेश्राम सिन्देवाही

चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी होती तेव्हा अपघाताचे प्रमाण कमी होते मात्र लॉकडावुनंतर दारूबंदी उठविण्यात आली तेव्हापासून अपघाताचे प्रमाण जास्त वाढले असल्याचे दिसून येतं आहे.

आज सकाळी साडेसहाच्या सुमारास सिंदेवाही मुलं रोडवरती सिंदेवाहीच्या स्मशानभूमीच्या समोर पुलावरती दोन ट्रक समोरासमोर धडक दिल्याने मोठा अपघात झाला त्या अपघातामुळे तब्बल चार तास वाहतूक बंद पडली होती. दोन्ही ट्रकला पुलावरून रस्त्याच्या कडेला करण्यासाठी दोन क्रेन मशीन व एक जेसीबी मशीन चा आधार घेण्यात आले. तोपर्यंत दोन किलोमीटर पर्यंत वाहनांची लांब रांग लागली होती.
चंद्रपूर जिल्ह्यात रोज अपघात होत आहेत आणि अपघात झालेल्या अनेक प्रकरणांत गाडी चालक दारु पिऊन वाहन चालवितांना आढळून आले आहे. त्यामुळे निअपराध लोकांचा जीव जात आहे.
बार व देशी दारूचे दुकान वेळे अगोदर सुरु करणं आणि वेळेच्या नंतर बंद करण्याची पद्धत सध्या सुरू आहे. शासनाने ठरवुन दिलेल्या वेळापत्रकला सध्या काही अर्थ उरलेला नाही.
अपघाताचे दुसरे कारणं म्हणजे रस्त्यावर पडलेले खड्डे नव्याने किंवा डागडुजीचे रस्त्यावर बेजबाबदार पने सुरु असलेले कामे. सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांचे दुर्लक्ष.
अनेक रस्त्यावर पथचिन्हे दिसुन येत नाहीत. रस्त्याच्या दुतर्फा झुडपी जंगलाची वाढ. त्यामुळे समंधित अधिकाऱ्यांनी ताबडतोब आपली जिम्मेदारी दाखविने आवश्यक आहे.अशी चर्चा घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी केली आहे.