सिंदेवाही पं. स. सभापतीचे निवासस्थान पडले धूळखात ◾ निवासस्थानातून अचानक फर्निचर झाले गायब.

सिंदेवाही पं. स. सभापतीचे निवासस्थान पडले धूळखात

◾ निवासस्थानातून अचानक फर्निचर झाले गायब.

सिंदेवाही : जिल्हा परिषदे नंतर पंचायत समितीच्या सभापती यांचे साठी शासनाने लाखो रुपयाचे निवासस्थाने बनवली असताना सिंदेवाही पंचायत समितीच्या सभापती महोदयांचे निवासस्थान मागील कित्येक वर्षांपासून धूळखात पडले असून त्यामध्ये असणारे फर्निचर अचानक गायब झाले असल्याने पंचायत समितीच्या परिसरात एकच चर्चा सुरू असल्याचे दिसून येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महत्वाच्या पदाधिकारी यांना त्यांचे कार्यालयीन स्थळी निवासस्थाने बनवली असतात. आणि त्या निवासस्थानात राहून पदाधिकारी आपला पदभार सांभाळत असतात. दरम्यान सिंदेवाही पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात सभापती महोदय यांचेकरिता निवासस्थान बनविले आहे. तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात दौरा करण्याकरिता त्यांना एक चारचाकी गाडी सुद्धा निवासस्थानी ठेवण्यात आली आहे. या शासकीय निवासस्थान मध्ये सभापती साठी लागणारे सोफा, पलंग, डायनिंग टेबल यासारखे महागडे फर्निचर सुद्धा लावण्यात आले . मात्र मागील कित्येक वर्षापासून या निवासस्थानात कोणतेही सभापती महोदय राहत नसल्याने लाखो रुपयांचे तयार करण्यात आलेले शासकीय निवासस्थान धूळखात पडले असून या निवासस्थानातील फर्निचर गायब झाले असल्याने निवासस्थानातून फक्त फर्निचर कोण गायब करणार ? हा एक संशोधनाचा विषय बनला आहे. सध्या सभापतींचा कार्यकाळ संपून मुदतपूर्व निवडणुका न झाल्याने पंचायत समितीवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. मात्र सभापतींच्या दालनातील फर्निचर जैसे थे. आणि निवासस्थानातील फर्निचर गायब झाले आहे. याला दोषी कोण आहे ? याबाबतची चौकशी होणार का ? दोषी असेल त्यांचेवर कारवाही कोण करणार ? अशी चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू आहेत. शासनाच्या लाखो रुपयांची उधळण करीत सभापतींना निवासस्थाने तयार करण्यात आली. मात्र त्या निवासस्थानात सध्या कोणतेही सभापती राहत नसल्यामुळे लाखो रुपयांचे निवासस्थाने धूळखात पडली असल्याचे दिसून येत आहे.