राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी.वावा यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी.वावा यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

Ø सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध विषयावर घेणार आढावा

चंद्रपूर, दि. 20 : राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे (नवी दिल्ली) सदस्य डॉ. पी.पी.वावा हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, दि.21 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वा. महानगरपालिका सभागृह, चंद्रपूर येथे सफाई कर्मचारी यांच्याशी संबधित विविध विषयावर अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक. तसेच दुपारी 4 वा. जिल्हा नियोजन कार्यालय सभागृह येथे सफाई कर्मचारी यांच्याशी संबंधित विविध विषयावर अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतील. रात्री चंद्रपूर येथे मुक्काम. रविवार, दि. 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता नागपूरकडे प्रयाण.