कामगार विभागामार्फत बालकामगार विरोधी सप्ताह साजरा

कामगार विभागामार्फत बालकामगार विरोधी सप्ताह साजरा

 

चंद्रपूर, दि. 29 : सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातर्फे बालकामगार विरोधी सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे हस्ते रोजी करण्यात आले.

 

बालविरोधी सप्ताहनिमित्त कामगार विभागामार्फत विविध ठिकाणी धाडसत्र राबविण्यात येवून बालकामगार तपासणी करण्यात आली. आस्थापना चालकांकडून बालकामगार कामावर ठेवण्यात येणार नाही, अशी हमीपत्रे भरून घेण्यात आली. तसेच 21 नोव्हेंबर रोजी दुकाने व आस्थापना असोसिएशन, होटेल असोसिएशन, मॅन्युफॅक्चरींग असोसिएशन आणि विविध कामगार संघटना यांच्या बैठका आयोजित करून सुधारित बालकामगार अधिनीयम व त्यातील दंडात्मक तरतुदीची माहिती देण्यात आली. तसेच बालकामगार आढळल्यास कामगार आयुक्त कार्यालय किंवा हेल्प लाईन क्रमांक 1098 यावर संपर्क करण्याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त यांचेमार्फत आवाहन करण्यात आले.