नविन मतदार नोंदणी तथा मतदार यादीचा विशेष सक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू -तहसीलदार सिंदेवाही

नविन मतदार नोंदणी तथा मतदार यादीचा विशेष सक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू -तहसीलदार सिंदेवाही

सिंदेवाही – 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर मतदार यादीचा विशेष सक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम मा.मुख्य निवडणूक अधिकारी म.रा. यांचेकडील आदेशा नुसार सुरु झालेला आहे. सदर कार्यक्रमा नुसार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 ते 09 डिसेबर 2023 या कालावधी मध्ये दावे हरकती स्विकारण्यात येणार आहे.त्यामध्ये नविन मतदार नोंदणी ,मय्यत मतदारांची वगळणी किंवा स्थलांतरी,आक्षेपित मतदारांची वगळणी तसेच मतदार यादीतील तपशिल दुरुस्ती बाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.त्याच प्रमाणे दिनांक 04 नोव्हेबर 2023 दिनांक 05 नोव्हेबर 2023 व दिनांक 25 नोव्हेबर 2023 ,26 नोव्हेबर 2023 या चार दिवशी विशेष मोहिम अंतर्गत मतदार नोदी शिबीर सिंदेवाही तालुक्यात मतदान केंद्रावर आयोजीत करण्यात आलेले आहे.
तरी सर्व पात्र मतदारांना सदर कालावधी मध्ये नविन मतदार नोंदणी, दुरुस्ती किंवा आक्षेपित नोंद विहीत नमुना नंबर 6,7,8 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे कडे जमा करावे किंवा ऑनलॉईन व्होटर हेल्पलाईन ॲप व्दारे नोंदणी करण्यात यावी. सदर पुर्नरिक्षण कार्यक्रम मा.मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. अशी,माहीती संदीप पानमंद सहा.मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार सिंदेवाही, निवडणूक अधिकारी नायब तहसिलदार मंगेश तुमराम यांनी सांगितले आहे.