राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारतीय महिलाच्या विकासप्रती भुमिकाबाबत परीसंवादाचे आयोजन

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारतीय महिलाच्या विकासप्रती भुमिकाबाबत परीसंवादाचे आयोजन

सिंदेवाही प्रतिनिधी :-सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महाराष्ट्र पोलीस विभाग सिंदेवाही यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारतीय महिलाच्या विकासप्रती भुमिकाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अरविंद जैस्वाल सचिव विद्या प्रसारक संस्था सिंदेवाही हे होते. प्रमुख मार्गदर्शक मा.तुषार चव्हाण ठाणेदार पोलिस स्टेशन सिंदेवाही, डॉ.श्वेतल बंडावार स्त्री रोग चिकित्सक,दय रुपा राऊत पोलिस अंमलदार , प्राचार्य डॉ विजेंद्र बत्रा, डॉ लेमदेव नागलवाडे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, डॉ रिजवान शेख, डॉ सिध्दार्थ मदारे,प्रा.अमित उके, रणधीर मदारे पोलिस अमलदार , उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ विजेंद्र बत्रा यांनी केले.प्रास्ताविकातून भारतीय संस्कृतीचा आढावा घेऊन देशाच्या विकासात महिलांचे योगदान विषद केली. तुषार चव्हाण ठाणेदार यांनी महाराष्ट्रात शिक्षणाच्या संदर्भात सिंदेवाही अग्रेसर आहे तसेच विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपल्या विकासाला प्राधान्य देऊन कार्यरत राहावे व आपले भविष्य उज्ज्वल करुन नावारूपाला यावे असे आव्हान केले. डॉ श्वेतल बंडावार स्त्री रोग चिकित्सक यांनी महिलांच्यां विकासाप्रती भुमिका व्यक्त करुन त्यांनी कश्याप्रकारे शैक्षणिक, सांस्कृतिक व मानसिक आरोग्य जपावे यावर मार्गदर्शन केले. रूपा राऊत पोलिस अंमलदार यांनी मुलीनी चारित्र्यसंपन्न राहुन स्वतःचे भविष्य उज्ज्वल करावेत, तारूण्यात कुठल्याही वाईट संगतीचा परिणाम होता कामा नये. असे सुचवले.
अध्यक्षीय मार्गदर्शनात अरविंदजी जैस्वाल यांनी मुलगी ही आईवडिलांची लाडकी असते तेव्हा तिने शिक्षणातून गुणवान ,शीलवान व चारित्र्यसंपन्न बनने गरजेचे आहे , तेव्हा आपण आपल्या भविष्याला आकार देण्याचे काम करावे असा संदेश दिला. कार्यक्रमाचे संचालन डॉ रिजवान शेख तर आभार प्रदर्शन डॉ लेमदेव नागलवाडे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.